दही हंडी व गणेशोत्सव तयारीचा आयुक्तांनी घेतला आढावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दही हंडी व गणेशोत्सव तयारीचा आयुक्तांनी घेतला आढावा
दही हंडी व गणेशोत्सव तयारीचा आयुक्तांनी घेतला आढावा

दही हंडी व गणेशोत्सव तयारीचा आयुक्तांनी घेतला आढावा

sakal_logo
By

भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : आगामी दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त दिलीप ढोले यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मंडळांना देण्यात आलेल्या परवानग्या, आधीच्या बैठकीत दिलेल्या सूचनांचे पालन याबाबतचा आढावा आयुक्तांनी या बैठकीत घेतला.
मिरा भाईंदर शहरात अनधिकृत फलक लावण्यास मनाई आहे. आगामी उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फलक लागण्याची शक्यता असल्याने त्यावर तातडीने कारवाई करण्याबाबतचे आदेश आयुक्तांनी अतिक्रमण विभागाला दिले. उत्सवादरम्यान वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे रहदारीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी सतर्क राहण्याचे तसेच खड्डे तातडीने बुजवण्याचे, गटारांची तुटलेली झाकणे दुरुस्त करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उत्सवादरम्यान पाणीटंचाई होणार नाही, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना पाणीपुरवठा देण्यात आल्या. तसेच गणेश विसर्जनादरम्यान सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित राहण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी पोलिस विभागाशी समन्वय ठेवण्याचे आदेशही आयुक्तांनी या वेळी दिले. बैठकीला उपायुक्त मारुती गायकवाड, संजय शिंदे, रवी पवार, शहर अभियंता दीपक खांबित तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93390 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..