उरणमधील रस्त्यांची चाळण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरणमधील रस्त्यांची चाळण
उरणमधील रस्त्यांची चाळण

उरणमधील रस्त्यांची चाळण

sakal_logo
By

उरण, ता. १७ (वार्ताहर) ः तालुक्यातील वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सार्वजनिक बांधकाम, सिडको, राष्ट्रीय रस्ते अखत्यारित असलेल्या रस्त्यांचा यात समावेश असल्याने गणेशोत्सवात भक्तांच्या मार्गात खड्ड्यांचे विघ्न येणार आहे.
उरण शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असणाऱ्या दास्तान-चिर्ले, जासई -गव्हाण रस्त्यावर अवजड वाहतुकीमुळे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ते धोकादायक बनला आहे; तर जासई-गव्हाण फाटा मार्गावर रस्त्यांच्या कामांमध्ये दिरंगाई झाल्याने प्रवास बिकट झाला आहे. हीच परिस्थिती उरण-पनवेल रस्त्याची झाली असून लोकप्रतिनिधी, तसेच प्रशासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे सणासुदीच्या काळात खड्ड्यांमधून प्रवासाची वेळ नागरिकांवर आली आहे.
-----------------------------------
खोपटा पुलाच्या खालील कोस्टल रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी आदेश दिले आहेत. लवकरच हे खड्डे बुजवण्यात येतील.
-एच. डी. नहाने, कार्यकारी अभियंता, सिडको

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93395 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..