प्रेयसीने कर्ज न फेडल्‍याने आत्‍महत्‍या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेयसीने कर्ज न फेडल्‍याने आत्‍महत्‍या
प्रेयसीने कर्ज न फेडल्‍याने आत्‍महत्‍या

प्रेयसीने कर्ज न फेडल्‍याने आत्‍महत्‍या

sakal_logo
By

कळवा, ता. १७ (बातमीदार) : घराशेजारी राहणाऱ्या व एकाच खासगी फायनान्स कंपनीमध्ये काम करताना प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्या प्रेयसीने आपल्या प्रियकराच्या नावावर घेतलेले कर्ज फेडण्यास टाळाटाळ केली. अखेर फायनान्स कंपनीने कर्जफेडीचा लावलेला तगादा सहन न झाल्याने प्रियकराने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी रात्री कळव्यात घडली. यासंदर्भात २० वर्षीय तरुणीवर कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्याग्रस्त २६ वर्षीय तरुण विक्रम मोरे हा कळवा रेल्वे स्थानकाच्या जवळील रमाबाई कॉलनीमध्ये राहतो. शेजारी राहणाऱ्या व एकाच फायनान्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या २० वर्षीय मुलीशी त्याचे प्रेमप्रकरण सुरू होते. या प्रेमातून प्रेयसीने विक्रमच्या नावे ५० हजार रुपये कर्ज घेतले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93406 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..