डहाणू पारनाका येथील पोलीस चौकी हटवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणू पारनाका येथील पोलीस चौकी हटवली
डहाणू पारनाका येथील पोलीस चौकी हटवली

डहाणू पारनाका येथील पोलीस चौकी हटवली

sakal_logo
By

डहाणू, ता. २३ (बातमीदार) : पारनाका येथील पोलिस चौकी हटवून पर्यायी जागेवर सर्व सोयी-सुविधायुक्त कंटेनर मध्ये सदर चौकी स्थलांतरित करण्यात आली आहे. नागरिकांचा वाढता वावर तसेच जवळच असणारा डहाणूचा समुद्रकिनारा पाहण्यासाठी नागरिकांचा सातत्याने वाढता ओघ यामुळे पारनाका येथे पोलिसांमार्फत चौक बंदोबस्त ठेवण्यात येतो. तसेच या मार्गावर असणारे तहसील कार्यालय, दिवाणी न्यायालय, पंचायत समिती, प्रांत कार्यालय, या ठिकाणी नागरिकांची सातत्याने ये-जा असते. यामुळे पारनाकाच्या दोन्ही बाजूला सतत वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतुकीला सतत अडथळा येत असतो. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त चौक ठेवता यावा, यासाठी पारनाका या ठिकाणी कंटेनरमध्ये सर्व सुविधांनी युक्त अशी तात्पुरती पोलिस चौकी बनवली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93421 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..