बेकायदा इमारतींवर पालिकेचा हातोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा इमारतींवर पालिकेचा हातोडा
बेकायदा इमारतींवर पालिकेचा हातोडा

बेकायदा इमारतींवर पालिकेचा हातोडा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १७ ः पावसाळ्यातील परिस्थितींचा फायदा घेऊन बेकायदा इमारती उभारणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सानपाडा येथे विनापरवाना उभारण्यात आलेली चारमजली इमारत पालिकेने जमीनदोस्त केली आहे.
कोविडमुळे गेली दोन वर्षे बेकायदा इमारतींविरोधात महापालिकेची कारवाई झाली नव्हती. कोविडच्या कामात अधिकारी, कर्मचारी व्यग्र असल्यामुळे कारवाया थंडावल्या होत्या. त्याचा गैरफायदा घेत नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत ऐरोली, घणसोली, गोठिवली व तळवली, कोपरखैरणे, नेरूळ, जुईनगर, सानपाडा आणि बेलापूर येथील गावठाणांमध्ये बेकायदा इमारती उभ्या केल्या होत्या. सानपाडा गावाशेजारी अशाच एका चार मजली इमारतीवर पालिकेने कारवाई केली आहे. तब्बल ६२५ चौरस मीटर क्षेत्रफळ आकाराच्या भूखंडावर पक्के बांधकाम करण्यात आले होते. तसेच याप्रकरणी महापालिकेने संतोष भोईर याच्यावर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथकातील अधिकारी आणि उपायुक्त अमरिश पटनिगिरे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
------

घणसोली पालिकेच्या रडारवर
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत सध्या दिघ्यानंतर घणसोलीतील गोठिवली व तळवली या भागात सर्वाधिक बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. स्थानिक नगरसेवकांच्या आशीर्वादाने ही बांधकामे सर्रासपणे उभी केली जात आहेत. यापुढील काळात या भागातील बांधकामांवर कारवाई करण्याचे नियोजन अतिक्रमणविरोधी पथकाने केले आहे.
---
बोनकोडेतील त्या इमारतीवर कारवाई होणार
बोनकोडे येथे महापालिकेच्या जागेवर बेकायदा पद्धतीने उभारण्यात आलेल्या त्या इमारतीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. एका माजी मंत्र्याच्या नातेवाईकाची ही इमारत असल्यामुळे महापालिका कारवाई करत नसल्याची चर्चा नवी मुंबईत सुरू आहे. विशेष म्हणजे या इमारतीवर अतिक्रमणविरोधी पथक कारवाई करण्यासाठी गेले होते, परंतु राजकीय दबावानंतर या पथकाला माघारी बोलावल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती, पण पोलिस बंदोबस्तात या इमारतीवर कारवाई होणार असल्याचा दावा अतिक्रमणविरोधी पथकाने केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93430 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..