सेप्टिक टँकमध्ये उतरणाऱ्यांची महापालिकेकडून वार्डनिहाय यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेप्टिक टँकमध्ये उतरणाऱ्यांची 
महापालिकेकडून वार्डनिहाय यादी
सेप्टिक टँकमध्ये उतरणाऱ्यांची महापालिकेकडून वार्डनिहाय यादी

सेप्टिक टँकमध्ये उतरणाऱ्यांची महापालिकेकडून वार्डनिहाय यादी

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : मुंबई महापालिका क्षेत्रात रहिवासी तसेच खासगी भागात सेप्टिक टॅंकमध्ये अकुशल कामगार उतरल्याने अनेकदा अपघात झाले. हे अपघात टाळण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून सेप्टिक टॅंकमध्ये उतरणाऱ्या व्यक्तींची वॉर्डनिहाय यादी तयार करण्याची महापालिकेने तयारी केली आहे. अकुशल तसेच प्रशिक्षित नसलेल्या व्यक्ती सेप्टिक टॅंकमध्ये उतरल्याने अनेकदा अपघात झाल्याच्या घटना याआधी समोर आल्या आहेत. पालिकेच्या कर्मचाऱ्यांशिवाय सेप्टिक टॅंकमध्ये उतरण्यासाठी कोणालाही परवानगी नाही. याआधी झालेल्या अपघातांमध्ये लोकांचा जीव गेल्यानेच पालिकेने नियमावली कठोर केली आहे. त्यानुसार महापालिकेने आता प्रशिक्षित आणि कुशल कमर्चाऱ्यांची डिरेक्टरी तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93434 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..