कसरत करत प्रशासन मरकटवाडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसरत करत प्रशासन मरकटवाडीत
कसरत करत प्रशासन मरकटवाडीत

कसरत करत प्रशासन मरकटवाडीत

sakal_logo
By

भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. १७ ः मोखाड्यातील बोटोशी ग्रामपंचायतीमधील मरकटवाडी येथील आदिवासी महिलेच्या जुळ्या बालकांच्या मृत्यूची हृदयद्रावक घटना ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध करून समोर आणली. त्यामुळे सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य कसरत करत पायी मरकटवाडीत दाखल झाले. त्यांनी भौगोलिक स्थिती पाहून बांधकाम विभागाला अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही मोखाड्यात अनेक खेड्यापाड्यांत जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे तेथे आरोग्य सेवाही पोहोचलेली नाही. अशा दुर्दम्य स्थितीत येथील आदिवासी आपले जीवन कंठत आहेत. मोखाड्यातील बोटोशी ग्रामपंचायतीमधील मरकटवाडी येथील वंदना बुधर या आदिवासी महिलेच्या जुळ्या नवजात बालकांना वेळेत व स्थानिक ठिकाणी उपचार न मिळाल्याने त्यांचा १३ ऑगस्टला मरकटवाडीतच मृत्यू झाला. त्यानंतर प्रचंड रक्तस्राव झाल्याने मातेला रस्ता नसल्याने स्वातंत्र्यदिनी मुसळधार पावसात डोली करून पायपीट करत दवाखान्यात दाखल करावे लागले होते. बुधवारी (ता. १७) पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुशी सिंग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, हबीब शेख, कुसुम झोले यांसह अन्य अधिकारी व कार्यकर्त्यांनी डोंगरदऱ्यांतील रस्ता कसरत करत पार करत मरकटवाडी गाठली.
...
रस्ता दृष्टिपथात
सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाला अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी ‘सकाळ’ला सांगितले आहे. त्यामुळे या वर्षात मरकटवाडीला जोडणारा रस्ता दृष्टिपथात येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
...
जिल्ह्यात संपर्कात नसलेली सुमारे १५० खेडी-पाडे आहेत. तेथे रस्ते बनवण्यासाठी मागील वर्षापासून नियोजन करण्यात येत आहे. संयुक्त आराखडा तयार करून तो वरिष्ठांकडे पाठवला जाणार आहे.
- सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93446 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..