जव्हारमध्ये बाप्पाच्या आगमनासाठी मूर्तिकार व्यस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हारमध्ये बाप्पाच्या आगमनासाठी मूर्तिकार व्यस्त
जव्हारमध्ये बाप्पाच्या आगमनासाठी मूर्तिकार व्यस्त

जव्हारमध्ये बाप्पाच्या आगमनासाठी मूर्तिकार व्यस्त

sakal_logo
By

जव्हार, ता. २० (बातमीदार) : मागील दोन वर्षे कोरोनामुळे सण-उत्सवांवर निर्बंध होते. यावर्षी राज्य सरकारने निर्बंध कमी केल्यामुळे यंदा धूमधडाक्यात सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. यातच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र तयारी सुरू आहे; तर मूर्तिकार गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवत आहेत. सार्वजनिक मंडळे देखावे पूर्ण करण्याच्या कामाला लागले आहेत.
सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसांवर आले आहे. त्यामुळे जव्हार शहरासह तालुक्यातील गणेश मंडळांच्या तयारीने जोर धरला आहे; तर भाविकदेखील बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. शहरातील अनेक कारागिरांकडे मूर्तीचे रंगकाम सुरू आहे. अनेक गणपतीच्या कार्यशाळेत मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात कारागीर व्यस्त आहेत. गणेश मंडळांनी मूर्तीचे बुकिंग सुरू केले आहे. गणेश मंडळे गणेशोत्सवाच्या दिवशीच मूर्ती नेत असून अशा मूर्तींचे काम कारागिरांकडून पूर्ण करणे सुरू आहे. घरगुती गणेशाची स्थापना करण्यासाठी नागरिक लहान मूर्तीलाच पसंती देतात. त्यानुसार लहान मूर्ती तयार केल्या जात आहेत.
कार्यकर्त्यांची लगबग वाढली
सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांचीही लगबग वाढली आहे, मंडप उभारणी, वर्गणी जमा करणे अशी कामे सुरू आहेत. तसेच मंडळांकडून विविध परवानग्या घेण्याचे काम सुरू आहे. तसेच मंडळांचे कार्यकर्ते गणेशोत्सवासाठी बैठका घेत आहेत.