उरणच्या वीर सावरकर मैदानात सामन्यांचा थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरणच्या वीर सावरकर मैदानात सामन्यांचा थरार
उरणच्या वीर सावरकर मैदानात सामन्यांचा थरार

उरणच्या वीर सावरकर मैदानात सामन्यांचा थरार

sakal_logo
By

उरण, ता. २३ (वार्ताहर) : द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय १४ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेमध्ये खोपोली, पनवेल आणि उरणमधून एकूण १२ संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अंतिम विजेता संघ द्रोणागिरी करंजा इंग्लिश माध्यमिक हायस्कूल, तर मुळेखंड उरण येथील कोळी किंग हा संघ उपविजेता ठरला. तसेच राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये मुंबई, मुंब्रा, खोपोली, पनवेल आणि उरण येथील १६ संघांनी सहभाग घेतला होता. या रोमहर्षक सामन्याचा उरणवासीयांनी चांगलाच आनंद घेतला. जवळजळ दीड हजार फुटबॉलच्या रसिक प्रेक्षकांनी अंतिम सामन्याचा थरार वीर सावरकर मैदानावर अनुभवला.
या रोमहर्षक सामन्यामध्ये वीरेश्वर खोपोली संघाने केएफए खोपोली संघाला १ विरुद्ध शून्य गोलने पराभूत करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. वीरेश्र्वर खोपोली संघाने राज्यस्तरीय फुटबॉल प्रथम क्रमांक पटकविला. जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत ६ हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. २१ किलोमीटर पुरुष ओपन गटात राज सरोदे प्रथम क्रमांक, द्वितीय स्वराज पाटील, तृतीय राजेश तांबोळी, उत्तेजनार्थ - प्रशांत घरत, सचिन कामत; तर १० किलोमीटर महिला खुल्या गटात प्रथम ऋतुजा सिकवण, द्वितीय सुजाता माने, तृतीय मयुरी चव्हाण, उत्तेजनार्थ साक्षी पाटील, ईश्वरी चिर्लेकर; तसेच विशेष विद्यार्थीसाठी आयोजित २०० मीटर स्पर्धेत प्रथम सिद्धांत पाटील, द्वितीय दुर्वेश धोत्रे, तृतीय निशांत कोळी, उत्तेजनार्थ यश रुपनर यांनी बाजी मारली.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे क्रीडा विभागप्रमुख भरत म्हात्रे, खजिनदार शिवेंद्र म्हात्रे, किरण घरत, जयेश पाटील, सचिन पाटील, मुकेश घरत, प्रवीण घरत, प्रकाश भोईर, विजय पाटील, सुनीत घरत, दिवेश घरत, रवींद्र पाटील, आकाश पाटील, ॲड. मच्छिंद्र घरत, द्रोणागिरी स्पोर्टसचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण तोगरे, राम चव्हाण, संजीव पाटील यांनी हातभार लावला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93540 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..