जखमीच्या कुटुंबीयांना शिवसेनेची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जखमीच्या कुटुंबीयांना शिवसेनेची मदत
जखमीच्या कुटुंबीयांना शिवसेनेची मदत

जखमीच्या कुटुंबीयांना शिवसेनेची मदत

sakal_logo
By

मोखाडा, ता. १९ (बातमीदार) ः मोखाड्यात मुसळधार पावसाने डोल्हारा येथील आदिवासी कातकरी वस्तीतील तीन घरे कोसळली आहेत. या घटनेत जानू सखाराम दिवे हे किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच मोखाडा तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिवे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना एका महिन्याचा किराणा, तसेच आर्थिक मदत केली.

मुसळधार पावसाने डोल्हारा गावातील आदिवासी कातकरी वस्तीतील सीता काशिराम सवरा, जानू सखाराम दिवे, रामदास वामन बोढेरे या आदिवासी कुटुंबाच्या घरांची पडझड झाली. घराच्या पडझडीत जानू सखाराम दिवे हे किरकोळ जखमी झाले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे मोखाडा पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ यांनी तहसीलदारांना त्याची माहिती दिली. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली. सरकारी मदतीची वाट न पाहता शिवसेनेने या कुटुंबाला तातडीने मदत करण्याचा निर्णय घेतला. या वेळी शिवसेना विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ, बलवान देशमुख, दीपक गवळी, रघुनाथ बोढेरे, अक्षय कोरडे, सुनील व्यापारी, नंदकुमार वाघ, गणेश खादे, रामदास बोढेरे इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93635 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..