बोईसरमध्ये बक्षिसांची खैरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोईसरमध्ये बक्षिसांची खैरात
बोईसरमध्ये बक्षिसांची खैरात

बोईसरमध्ये बक्षिसांची खैरात

sakal_logo
By

बोईसर, ता. १९ (बातमीदार) ः बोईसरमध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. शहरात अंदाजे ५५ सार्वजनिक, तर ४५ खासगी दहीहंडी बांधण्यात आल्या होत्या. कोरोनामुळे गेली दोन वर्षे दहीहंडी उत्सवावर निर्बंध आले होते. त्यामुळे यंदाचा सण लोकांसाठी पर्वणी ठरला.
बोईसरमध्ये भाजपकडून १ लाख अकरा हजार १११ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले. तसेच, भाजपचेच अशोक वडे यांनीही दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते; तर शिवसम्राट प्रतिष्ठानतर्फे नीलम संखे आणि मुकेश पाटील यांनी आयोजन केले. बहुजन विकास आघाडीकडून ५१ हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले. ग्रामीण भागात मात्र बक्षिसे लावून दहीहंडी साजरी न करता एकत्रित होऊन हंड्या फोडण्यात आल्या. गोविंदा पथकांचा प्रतिसाद व नागरिकांचा उत्साह शिगेला पोहचला होता. या वर्षी हा उत्सव अतिशय जल्लोषात साजरा झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93637 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..