केईएम रुग्णालयात ३० अतिरिक्त बेड्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केईएम रुग्णालयात ३० अतिरिक्त बेड्स
केईएम रुग्णालयात ३० अतिरिक्त बेड्स

केईएम रुग्णालयात ३० अतिरिक्त बेड्स

sakal_logo
By

एमआयसीयूची वानवा संपणार
केईएम रुग्णालयात ३० अतिरिक्त एमआयसीयू बेड्स वाढवण्यावर भर
अॅनेस्थेशिया आयसीयू बेड्समध्येही वाढ होणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबईतील केईएम रुग्णालयातील एमआयसीयू बेड्ससाठी होणारी धावाधाव कमी होण्याची अपेक्षा आहे. कारण लवकरच रुग्णालयात अतिरिक्त ३० एमआयसीयू बेड्स वाढवण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. त्यासोबत अॅनेस्थेशिया आयसीयू बेड्समध्येही वाढ होणार असून याचा फायदा लवकरच सर्वसामान्य रुग्णांना होईल, अशी आशा केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी व्यक्त केली आहे.
खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेऊ शकत नसलेल्या, अधिक गंभीर रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकदा पालिका रुग्णालयांमध्ये एमआयसीयूसाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे पालिकेच्या किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाने आता त्यांचे वैद्यकीय अतिदक्षता विभाग (एमआयसीयू) मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ॲनेस्थेशिया आयसीयू बेडदेखील वाढवण्यावर रुग्णालय प्रशासनाकडून काम सुरू आहे.
रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, ते ३० खाटांचे एमआयसीयू उभारणार आहेत आणि वॉर्डांची पुनर्रचना केली जाणार आहे. पायाभूत सुधारणांबद्दल बोलताना केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत म्हणाल्या, ‘‘पुढील दोन आठवड्यांत एमआयसीयूची ताकद दुप्पट होईल. नवीन एमआयसीयूत ३० बेड्स असतील. सहा बेड्स स्ट्रोक रुग्णांसाठी राखीव असतील आणि बाकी मेडिसीन रुग्णांसाठी असतील. दुसरे म्हणजे ॲनेस्थेशिया आयसीयूही लवकरच सुरू होणार आहे. याचे काम सुरू आहे; तर एमआयसीयूचे काम झाले आहे. ॲनेस्थेशिया आयसीयू विभागात एकूण १२ बेड्स असतील.’’
रुग्णांचे नातेवाईक आयसीयू बेड्सच्या शोधात एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात धाव घेत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. एमआयसीयू आणि इतर वॉर्डांचे बळकटीकरण होणे अनिवार्य आहे. ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या संख्येने आयसीयू लागणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळता येऊ शकेल.

चौकट
एमआयसीयू बेडची संख्या ३०
‘‘जंबो कोविड केंद्रे बंद झाल्यापासून अतिरिक्त एमआयसीयू बेड्सची सोय करण्याबाबत अनेक बैठका झाल्या आहेत. रुग्णांचा भार लक्षात घेता बेड्सची वाढ करून एमआयसीयू बेडची संख्या ३० करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, आम्ही जंबो केंद्रांमधील सर्व आवश्यक वैद्यकीय उपकरणे वापरणार आहोत,’’ असे रुग्णालयाच्या एका डॉक्टरने सांगितले.

चौकट
फेलोशिप कोर्स सुरू करण्याचा विचार
रुग्णालयात प्रगत वैद्यकीय उपकरणे असतील, जी गंभीर रुग्णांना हाताळणाऱ्या विशेष डॉक्टरांद्वारे व्यवस्थापित केली जातील. शिवाय, रुग्णालय क्रिटिकल केअर मॅनेजमेंटमध्ये फेलोशिप कोर्स सुरू करण्याचा विचार करत आहे. सुरुवातीला या अभ्यासक्रमांसाठी दोन जागा उपलब्ध असतील.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93641 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..