दक्षिण मुंबई परिसरात ‘बोल बजरंग बली की जय’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दक्षिण मुंबई परिसरात ‘बोल बजरंग बली की जय’
दक्षिण मुंबई परिसरात ‘बोल बजरंग बली की जय’

दक्षिण मुंबई परिसरात ‘बोल बजरंग बली की जय’

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. १९ (बातमीदार) ः तब्बल दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा दक्षिण मुंबईत गोविंदांचा जल्लोष पाहायला मिळाला. नव्या उत्साहात गोविंदा पथकांनी दहीहंड्या फोडल्या. ‘बोल बजरंग बली की जय’ मानवी मनोरे रचत हंड्या फोडल्या.
कुलाबा कफ परेड येथील कोळी बांधवांनी कोळीवाड्यात हंडी फोडत कोळीगीतांवर पारंपरिक नृत्य केले. बधवार पार्क येथील मच्छीमार कॉलनी येथे मांगेला कोळी समाजाने जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केला. गिरगाव येथे शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांची दहीहंडी विशेष ठरली. याच भागात काही ठिकाणी मनसेच्या विभाग अध्यक्ष वृशांत वडके यांनी दहीहंडी उत्सवाच्या आयोजन करीत विविध गोविंदा पथकांना हंडी फोडण्याचे निमंत्रण दिले होते. मुंबादेवी कुंभारवाडा येथे मनसेचे केशव मुळे, आशीष साखरकर आणि प्रथमेश साळेकर यांनी उत्सव आयोजित केला होता. उमरखाडी येथील सार्वजनिक दहीकाला उत्सव मंडळाच्या वतीने तीन ट्रकमधून विविध चलचित्रे सादर करण्यात आली होती. दुर्गादेवी गणेशोत्सव मंडळाच्या महिला गोविंदाने ‘हम भी कुछ कम नही’ या आवेशात जल्लोष केला. यंग अरुणोदय गोविंदा पथक, यंग उमरखाडी गोविंदा पथक आणि श्रीराम गोविंदा पथके यांनी स्थानिक मानाच्या दहीहंड्या फोडत नायगाव, वरळी आणि ठाणे येथे कूच केली. कोंबडी बाजा, बेंजो आणि बिग साऊंड सिस्टीमच्या संगीतावर चित्रपटातील मराठी-हिंदी लोकप्रिय गाण्यांवर गोविंदा नाचत जल्लोष करताना दिसत होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93645 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..