‘तोवर डोक्यावरचे केस कापणार नाही’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘तोवर डोक्यावरचे केस कापणार नाही’
‘तोवर डोक्यावरचे केस कापणार नाही’

‘तोवर डोक्यावरचे केस कापणार नाही’

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १९ (बातमीदार) ः दहीहंडीचे आयोजक आमदार राम कदम यांनी या वेळी दहीहंडीच्या मंचावर एक संकल्प केला. घाटकोपर विधानसभेतील प्रत्येक गृहिणीच्या घरात पाणी मिळत नाही, तोवर मी डोक्यावरचे केस कापणार नाही, असा संकल्प कोला. गेली अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेवर सेनेची सत्ता असतानाही डोंगर भागातील लोकांना पाणी मिळत नाही. बऱ्याच नोकरी करणाऱ्या महिलांना पाण्यासाठी कसरत करावी लागते. रात्री जागून पाणी भरावे लागते, असेही ते म्हणाले. या वर्षी माझ्या दहीहंडी उत्सवात महापालिकेच्या भ्रष्टाचार विरोधात हंडी लावली असल्याचे राम कदम म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वेळी गोविंदांशी संवाद साधताना म्हणाले की, तुम्ही सहा-सात थर रचता, आम्ही तर ५० थरांची हंडी केव्हाच फोडली. हे थर आणखी वाढतील, असेही ते म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93664 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..