विठ्ठलाला साकडं घालून वारकऱ्यांनी कोरोनवर केली मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विठ्ठलाला साकडं घालून वारकऱ्यांनी कोरोनवर केली मात
विठ्ठलाला साकडं घालून वारकऱ्यांनी कोरोनवर केली मात

विठ्ठलाला साकडं घालून वारकऱ्यांनी कोरोनवर केली मात

sakal_logo
By

वारकऱ्यांच्या रुपात गोविंदा पथक
नालासोपारा, ता २० (बातमीदार) : दोन वर्षांच्या निर्बधांनंतर यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा झाला. पण कोरोना काळात अचानक लागलेले निर्बंध, त्यात एका वारकऱ्यांच्या घरात एकाला झालेला कोरोना, आणि त्याच वारकऱ्यांने विठ्ठलाला साकडं घालून, कशी केली कोरोनवर मात याचा देखावा नालासोपाऱ्यातील ओम साई नवभारत गोविंदा पथकाने साकारत जन जागृतीचा संदेश दिला. विरारच्या श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळाच्या युवा आमदार दहीहंडी उत्सवात हा देखावा दाखवला आहे.

फोटो कॅप्शन : विरार श्रीकृष्ण जन्मोत्सव दहीहंडी उत्सवात वारकऱ्यांच्या वेशभूषेत विठ्ठलाप्रती श्रद्धा दाखविणारे ओम साई नवभारत गोविंदा पथक.

बोर्डीत दहीहंडी उत्साहात
बोर्डी, ता. २० (बातमीदार) : बोर्डी गावात राम मंदिर देवस्थानच्या वतीने रक्षाबंधनाच्या दिवसापासून मंदिरात धार्मिक उपक्रम राबविल्यानंतर कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा केला जातो. तर गोपाळकाल्याच्या दिवशी पालखी सोहळा आयोजित करून दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम शांततेने पार पडून पालखीचे विसर्जन गेले जाते. रण्याची परंपरा आहे मागील दोन वर्ष कोरोनामुळे दहीहंडीचा उत्सव साजरा करता आला नव्हता चालू वर्षी परिस्थितीचे यंदाही तरुणांनी हा उत्सव मोजक्या वेळेत व शांततेत पार पाडून बोर्डी गावाची परंपरा कायम ठेवली.

गतीमंदांनी लुटला ढाक्कमाकुमचा आनंद
मोखाडा, ता. २० (बातमीदार) : जव्हारमधील दिव्य विद्यालयाच्या गतीमंद विद्यार्थ्यांनी दहिहंडीचा आनंद लुटला. दोन थरांचा मनोरा रचून गतीमंदांनी दहीहंडी फोडली आहे. तसेच या विद्यालयात दहीहंडीचा ऊत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

कुडूसची दहीहंडी ‘गावदेवी’ पथकाने फोडली
वाडा, ता. २० (बातमीदार) : तालुक्यातील मानाची शिवसेना पुरस्कृत नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष गोविंद पाटील यांची दहीहंडी गावदेवी गोविंदा पथक चिंचघरने फोडली. त्यांना ५१ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. गावदेवी गोविदा पथकाने सात थरांची सलामी दिल्याने दहीहंडी फोडण्याचा मान त्यांना देण्यात आला. तर यावेळी मराठी कलाकारांनी सादर केलेले नृत्य दहीहंडीचे आकर्षण ठरले. तर वाडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनसेच्या वतीने पी. जे. हायस्कूलच्या प्रांगणात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. आई एकविरा गोविदा पथक वाडा यांनी ही दहीहंडी फोडली. तर जिजाऊ संघटनेची दहीहंडी आई एकविरा गोविंदा पथक यांनी फोडली.

विक्रमगड येथे पालखी सोहळा
विक्रमगड, ता. २० (बातमीदार) : तालुक्यात दहीहंडी उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. विक्रमगड येथील विठ्ठल मंदिर येथे रात्री कृष्णा जन्माष्टमीनिमित्त भजन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी विक्रमगड शहरातून श्री कृष्णाची पालखी काढून हा उत्सव साजरा करण्यात आला. तर विक्रमगड सारख्या ग्रामीण भागात दहीहंडी व गोविंदा पथकाला प्रोत्साहन देण्यासाठी विक्रमगड तालुक्यातील ओंदे येथील श्री. स्वामी समर्थ मठात आदिवासींसाठी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.


पालघरमध्ये जल्लोष
पालघर, ता. २० (बातमीदार) : पालघरमध्ये दहीहंडी जल्लोषात साजरी पालघर मधील साईनगर येथील शिवसेनेने दहीहंडी आयोजित केली होती, ही दहीहंडी सेना गोविंदाने फोडली. पालघर मधील मुख्य रस्त्यावर अनेक मंडळांनी दहीहंडी चा कार्यक्रम आयोजित केला होता. यामुळे सर्व रस्ते गोविंदाने फुलून गेले होते. डीजेचा तालावर नाचत गाजत दहीहंडी फोडण्यात आल्या सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

जिजाऊच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दही हंडी.
विक्रमगड, ता. २० (बातमीदार) : जिजाऊ अंध व मतीमंद मुलांची निवासी शाळा झडपोली या शाळेतील अंध व मतीमंद मुलांनी जल्लोषात दही हंडी उत्सव साजरा केला. तत्पूर्वी या दिव्यांग विद्यार्थ्यांनी रात्री शाळेत पाळणा बांधून व पुजा अर्चा केली भजने गायली. तसेच पाळणा गीत व आरत्यांचे गायन करून प्रसाद वाटप केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक महेश गायकवाड व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


डहाणूत चढाओठ
डहाणू, ता. २० (बातमीदार) : डहाणू तालुक्यात राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी हिरीरीने भाग घेत लाखमोलाची बक्षिसे जाहीर केली. यामुळे गोविंदा पथकांना आकर्षीत करण्यासाठी चढाओढ बघावयास मिळाली. गोपाळकाला निमित सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,भाजप या प्रमुख राजकीय पक्षांसह जिजाऊ सामाजिक संघटना यांनी डहाणू शहरासोबतच चिंचणी, वाणगाव, आशागड, कासा, बोर्डी, धुंदलवाडी या ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते.

साखरे गावात पुस्तकांची हंडी
मनोर, ता. २० (बातमीदार) : कृष्णजन्माष्टमी निमित्ताने मनोर गावातील हिंदू उत्सव समितीच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. गावच्या गोविंदा पथकाने विठ्ठल रखुमाई मंदिरा समोरची पहिली हंडी फोडल्यानंतर गावातील अन्य ठिकाणच्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा रवाना झाले होते. तर साखरे गावच्या ग्रामस्थांच्या वतीने बाळगोपाळांसाठी पुस्तक दहीहंडी बांधण्यात आली होती. गावच्या वाचनालयासमोर बांधलेल्या या हंडीच्या ठिकाणी डीजेच्या तालावर ग्रामस्थ आणि आदिवासी महिलांनी तारपा नृत्य केले. लहान मुलांनी दोन थर रचून हंडी फोडल्यानंतर लहानग्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.