दहीहंडी उत्सवात खड्यांचे विग्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहीहंडी उत्सवात खड्यांचे विग्न
दहीहंडी उत्सवात खड्यांचे विग्न

दहीहंडी उत्सवात खड्यांचे विग्न

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २० (बातमीदार) : कोरोनाच्या निर्बंधानंतर मोठ्या उत्सहात यंदा पहिल्यांदाच दहीहंडी उत्सव साजरा झाला. वसई-विरारमध्ये मोठमोठ्या दहीहंडी लावल्या होत्या. शेकडो गोविंदा पथक मोठ्या उत्स्फूर्तपणे बाहेर पडले होते, पण या गोविंदा पथकांना खड्ड्यांतून मार्ग काढत दहीहंडीपर्यंत कसरत करत पोहचावे लागले. वसईतील मनसेचे माजी नगरसेवक प्रफुल पाटील यांच्या दहीहंडी उत्सवात चक्क चिमुकल्यांनी खड्ड्यांचे फोटो दाखवत एक थरावर हंडीला सलामी दिली.
पावसाळा सुरू झाला तेव्हापासून वसई, विरार, नालासोपाऱ्यात अनेक मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. दहीहंडी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदारांना ठेकाही दिला. केवळ काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवून तर काही ठिकाणी डांबरीकरण करून काम केल्याचा दिखावा केला गेला. आजही वालीव, नवजीवन, विरार-जीवदानी रोड, नालासोपारा संतोष भुवन, बिलालपाडा या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण आहे.
दहीहंडी उत्सव जरी मोठ्या थाटामाटात साजरा होत असला तरी दहीहंडी महोत्सव सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी गोविंदा पथकांच्या मोटरसायकली, ट्रक, बस यांना मोठी कसरत करावी लागल्याने गोविंदा पथकांनी पालिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

फोटो कॅप्शन:-०१. वालीव परिसरात वसई फाट्याकडे जाणाऱ्या वालीव नाका येथे पडलेले खड्डे

०२. मनसे माजी नगरसेवक प्रफुल पाटील यांच्या दहीहंडी उत्सवात पहिल्या थरावर खड्ड्यांचे फोटो दाखवताना चिमुकले.

छायाचित्रे ः विजय गायकवाड