बेशिस्त रिक्षा चालकांचे कल्याण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेशिस्त रिक्षा चालकांचे कल्याण
बेशिस्त रिक्षा चालकांचे कल्याण

बेशिस्त रिक्षा चालकांचे कल्याण

sakal_logo
By

कल्याण, ता. २१ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली शहराच्या आजूबाजूच्‍या परिसरामध्ये केडीएमटी बसने सक्षम सुविधा न दिल्याने रस्त्‍यांवर हजारोंच्या संख्येने रिक्षा धावत आहेत. अनेक रिक्षाचालकांच्‍या बेशिस्त वर्तणुकीमुळे कल्याण आरटीओला कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे; परंतु तरीही रिक्षाचालक सुधारत नसल्याने बेशिस्त रिक्षाचालकांचे कल्याण, अशी आता शहराची ओळख होऊ लागली आहे.

कल्याण आरटीओ अंतर्गत डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आदी शहरांचा समावेश होतो. या शहरात सार्वजनिक प्रवासी वाहतूक करण्यासाठी परिवहन सेवा उपलब्ध असून कल्याण-डोंबिवली महापालिकेची केडीएमटी सेवा असली तरी ती तोकडी पडत असल्याने शहरात रिक्षांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

शहरातील ९० टक्‍के सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आहेत, शहरात स्टेशन ते घर असा रिक्षा प्रवास शेअर आणि मीटर पद्धतीने; तर शहरातील अंतर्गत प्रवास मीटर पद्धतीने अपेक्षित होता; मात्र, आजमितीस मीटर पद्धतीने रिक्षा प्रवास देण्यास सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे.

आरटीओ कारवाई आकडेवारी
आर्थिक वर्ष तपासणी दोषी प्रकरणे निकाली दंड वसुली (रुपयांमध्‍ये)
२०१९-२० ९,२८४ १,२५६ ७०१ ३१,३५, ९००
२०२०-२१ १,९७० ५८७ २०१ ६,५५,१५०
२०२१-२२ २,५०० ९५७ ३२९ १०,०५,१५०
२०२२- जुलै २०२२ १,२७० ७७७ १६३ ११,४९,७५०
-------------------------------------------------------------------------------------------
कोट
गणवेश घाला, प्रवाशांशी सौजन्याने वागा, वाढीव भाडे घेऊ नका, चौथी सीट घेऊ नका, आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा, नियमांचे पालन करा, असे आवाहन करूनही अनेक रिक्षाचालक नियमांचे पालन करत नाहीत. अशा चालकांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे.
- विनोद साळवी, आरटीओ प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93680 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..