भिवंडीत रिक्षा भाडे ‘जैसे थे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत रिक्षा भाडे ‘जैसे थे’
भिवंडीत रिक्षा भाडे ‘जैसे थे’

भिवंडीत रिक्षा भाडे ‘जैसे थे’

sakal_logo
By

भिवंडी, ता. २२ : शहरात कोणत्याही प्रकारची रिक्षा भाडेवाढ झालेली नाही. मात्र, काही रिक्षा चालकांकडून अधिक भाडे आकारले जात असल्‍याची तक्रार प्रवासी वर्गाकडून केली जात आहे. शहरात शेअर रिक्षा चालत असून कोणत्याही थांब्याची भाडेवाढ करण्‍यात आलेली नाही, अशी माहिती भिवंडीतील रिक्षा चालक-मालक महासंघाचे अध्यक्ष खालिद इरफान यांनी दिली.
भिवंडी शहर आणि परिसरात दहा हजारांपेक्षा जास्त रिक्षा असून, त्यांचे शहरासह ग्रामीण भागातील थांबे ठरलेले आहेत. त्यानुसार गेल्या चाळीस वर्षांपासून हा रिक्षा व्यवसाय सुरू आहे. शहरातील प्रवासी, पोलिस आणि रिक्षा संघटना यांच्या समन्वयाने शहरातील विविध थांब्यांवर शेअर भाडे आकारले जात आहे. शहरातील नागरिकांना हे भाडे परवडण्‍याजोगे आहे. मात्र, रिक्षाचे प्रवासी भाडे ठरविण्याचे अधिकार जिल्ह्याच्या उप प्रादेशिक परिवहन विभागाला असून ते भिवंडी शहराकडे फिरकतदेखील नाहीत. त्याचप्रमाणे आरटीओदेखील शहरात व परिसरात येत नसल्याने शहरात अवैध रिक्षा वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे; त्‍याचबरोबर नियम डावलणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांचेही प्रमाण वाढले आहे. काही रिक्षाचालक मनमानीपणे भाडे वसुली करीत प्रवाशांना वेठीस धरत आहेत. शहरात पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही इंधनावर चालणाऱ्या रिक्षा आहेत. मात्र, सीएनजीची भाववाढ झाल्याचे कारण पुढे करत काही भागातील रिक्षाचालकांनी प्रवासी भाडेवाढ केली आहे. मात्र गेल्‍या आठवड्यात सीएनजीचे दर कमी झाले. वास्तविक दोन थांब्यांतील भाडे मीटरप्रमाणे वाढले तर भाडेवाढ अपेक्षित आहे. त्यामुळे रिक्षा भाड्यातील ५० टक्के भाडेवाढ गैर असून अशा रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी शहरातील नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे मीटरप्रमाणे रिक्षाची सेवा मिळावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.
------------------------------------------
सध्या भिवंडीत शेअर रिक्षाप्रमाणे घेतलेले भाडे हे मीटरपेक्षा जास्त आहे. ते जर आरटीओच्या मीटरपेक्षा जास्त असेल तर भाडेवाढ केली पाहिजे. निवडणुकीचे लक्ष्य ठेवून काही रिक्षा संघटनेच्या पुढाऱ्यांनी भाडेवाढीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांचा निर्णय चुकीचा आहे.
- खालिद इरफान,
अध्यक्ष, भिवंडी रिक्षा चालक-मालक महासंघ
-----------------------------------------------------------
आम्ही आरटीओ व आरटीए अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार काम करून कायद्याची अंमलबजावणी करीत आहोत. कोणी जास्त भाडे घेतल्याची तक्रार केली तर आम्ही त्या रिक्षाचालकावर कारवाई करू. मात्र भाडेवाढीबाबत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही.
-राजेंद्र मायने, पोलिस निरीक्षक,
वंडी शहर वाहतूक उप विभाग
------------------------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93681 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..