सिमला सफरचंदाचा बाजारात बोलाबाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिमला सफरचंदाचा बाजारात बोलाबाला
सिमला सफरचंदाचा बाजारात बोलाबाला

सिमला सफरचंदाचा बाजारात बोलाबाला

sakal_logo
By

वाशी, ता. २० (बातमीदार) ः शीतगृहातील परदेशी सफरचंदाच्या तुलनेत आरोग्याच्यादृष्टीने हितकारक असलेल्या हिमाचल प्रदेशातील सिमला सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. व्रतवैकल्यांच्या श्रावण महिन्यात सफरचंदांची मागणी वाढल्याने एपीएमसी मार्केटमध्ये सिमला सफरचंदांची सहा ते आठ हजार पेट्यांची आवक झाली असून किलोला १०० ते १२० रुपयांपर्यंत विक्री होत आहे.
ऑगस्ट महिन्यात सिमला सफरचंदांचा हंगाम सुरू होतो. त्यानंतर लगेच काश्मीरमधील सफरचंदांचा हंगाम सुरू होतो. सिमला सफरचंदांचा हंगाम ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू असतो. हिमाचल प्रदेशातील कुलू, नारकंडा, ढल्ली, लाफू घाटीत सफरचंदांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. तसेच काश्मीरमधील सफरचंदांच्या तुलनेत सिमला सफरचंद टिकाऊ असतात. परदेशी सफरचंदांवर प्रक्रिया केली जाते. तसेच शीतगृहात साठवणूक होत असल्याने काश्मीर, सिमल्यातील सफरचंद आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असतात.

१०० ते १२० रुपयांपर्यंत विक्री
घाऊक बाजारात सिमला सफरचंदाच्या पेटीचे दर २२०० ते २८०० रुपये आहेत. एका पेटीत २५ ते २८ किलो सफरचंदे असतात. किरकोळ बाजारात एक किलो सफरचंदांचे दर १०० ते १२० रुपयांपर्यंत आहेत.

चौक
सिमला सफरचंदांवर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते. परदेशी सफरचंदांच्या तुलनेत देशी सफरचंदांचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. श्रावण, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात नैसर्गिकपणे लागवड केलेल्या या सफरचंदांना मागणी अधिक असते.
-अशोक उंडे, व्यापारी