विवाहबाह्य संबंधातून खंडणी उकळण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवाहबाह्य संबंधातून खंडणी उकळण्याचा प्रयत्न
विवाहबाह्य संबंधातून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

विवाहबाह्य संबंधातून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

sakal_logo
By

मनोर, ता. २१ (बातमीदार) : विवाहबाह्य संबंधांची माहिती सार्वजनिक करण्याची धमकी देत वृद्ध व्यक्तीकडून खंडणीची रक्कम स्वीकारताना महिलेच्या पतीला बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी आणि त्याच्या पत्नीने वृद्ध व्यक्तीकडून ३२ लाखांची रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. दरम्यान, त्यांच्या पत्नीची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

बोईसर परिसरातील प्रतिष्ठित वृद्ध व्यक्तीचे त्याच्या शेजारील एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. महिलेने विवाहबाह्य संबंधातून गरोदर असल्याचे सांगत गर्भपात करण्यासाठी त्याच्याकडून २० लाखांची रक्कम उकळली होती. त्यानंतर अन्य शारीरिक व्याधींचा त्रास सुरू झाल्याचे सांगत उपचाराचा खर्च आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैशांची मागणी केली जात होती. महिला आणि तिच्या पतीने विविध कारणे आणि ब्लॅकमेलिंग करून त्याच्याकडून सुमारे ३२ लाख रुपये उकळले. तसेच पैसे न दिल्यास शारीरिक संबंधाचा व्हिडीओ कुटुंबाला पाठवण्याची धमकी दिली जात होती. काही दिवसांपूर्वी या महिलेने हॉस्पिटलमध्ये उपचाराचे कारण देत पुन्हा पैशांची गरज असल्याचे सांगत तीन लाख रुपयांची मागणी केली होती. पैशांची मागणी आणि सततच्या ब्लॅकमेलिंगला वैतागून वृद्ध व्यक्तीने बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याच्याकडे मागणी केलेल्या रकमेपैकी दीड लाख रुपयांची रक्कम ओसवाल एम्पायरमध्ये स्वीकारताना महिलेच्या पतीला बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतले. या संशयित आरोपीच्या पत्नीची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बोईसर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक योगेश खोंडे गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93718 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..