पेणमधील काथोडचा धबधबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेणमधील काथोडचा धबधबा
पेणमधील काथोडचा धबधबा

पेणमधील काथोडचा धबधबा

sakal_logo
By

य. भि. तेरवाडकर, पेण
पेणपासून १३ किलोमीटर अंतरावर दुर्गम भागात सातेरी आदिवासीवाडीजवळ उंच डोंगरावरून कोसळणारा कोथाड धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. येथील आदिवासीवाडीत कातकरी बांधवांची वस्ती असल्यामुळे या धबधब्याला काथोड नावाने ओळखले जाते.
डोंगरावरील हिरवीगार झाडे, कडेकपारीतून निघालेले लहान ओहोळ, दाट पसरलेले धुके असे विहंगम दृश्य येथे दिसते. त्यात या डोंगरावरून खळखळणारा काथोडचा धबधबा. त्यामुळे पर्यटक येथे वीकेंड साजरा करण्यासाठी आपोआपच येतात. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरातील पर्यटक या ठिकाणी आपली हजेरी लावतात. उंचावरून कोसळणारे पाण्याची तुषारे अंगावर घेत ओलेचिंब भिजण्याचा आनंद लुटतात. पर्यटकांना येथील डोंगरावरील मनोहर दृश्य भूल घालते. यामुळे याठिकाणी अपघात होण्याची भीती असते. यासाठीच ठिकठिकाणी धोक्याचे फलक लावलेले आहेत. मात्र, येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्याची आवश्यकता आहे, असे येणाऱ्या पर्यटकांनी सांगितले.