कलाकारांनी लावली विविध दहीहंडी उत्सवाला हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलाकारांनी लावली विविध दहीहंडी उत्सवाला हजेरी
कलाकारांनी लावली विविध दहीहंडी उत्सवाला हजेरी

कलाकारांनी लावली विविध दहीहंडी उत्सवाला हजेरी

sakal_logo
By

कलाकारांची विविध दहीहंडी उत्सवांना हजेरी
मुंबई, ता. २० ः नेहमीच मालिका तसेच चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असलेल्या कलाकारांनी मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. काही कलाकारांनी याकरिता सुपारी घेतली होती, तर काही कलाकारांनी आपापले चित्रपट आणि मालिकांचे या उत्सवात जोरदार प्रमोशन केले. मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे समजते.
दादर येथील आयडीयल बुकच्या दहीहंडी उत्सवात कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’मधील गायकांनी हजेरी लावली; तसेच बॉईज ३ मधील कलाकार आणि रूप नगर के चिते या चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली. या कलाकारांबरोबर फोटो काढण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. रूप नगर के चीते या चित्रपटाचे दिग्दर्शक विहान सूर्यवंशी, निर्माते मनन शाह आणि कलाकार करण परब, कुणाल शुक्ल, हेमल इंगळे, आयुषी भावे, सना प्रभू आदी कलाकार आयडियलच्या दहीहंडीत सहभागी झाले होते. डबलडेकर ओपन बसमधून या टीमचे या दहीहंडी उत्सवात आगमन झाले. त्याचे तेथे जंगी स्वागत करण्यात आले. बॉईज ३ चित्रपटातील कलाकार पार्थ भालेराव, प्रतीक लाड, सुमंत शिंदे, विदुला चौघुले, गायक व संगीतकार तसेच बॉईज ३ चित्रपटाचे प्रेझेंटर अवधूत गुप्ते, दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी आयडियलबरोबरच प्रभादेवी मित्रमंडळ आदी ठिकाणच्या दहीहंडी उत्सवाला भेट दिली. बोरिवली मागाठणे येथील दहीहंडी उत्सवाला अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती. अन्य कलाकारांनीही विविध दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती.