पाचघर परिसरातील समस्यांचा आढावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाचघर परिसरातील समस्यांचा आढावा
पाचघर परिसरातील समस्यांचा आढावा

पाचघर परिसरातील समस्यांचा आढावा

sakal_logo
By

वाडा, ता. २१ (बातमीदार) : तालुक्यातील गारगाव जिल्हा परिषद गटातील पाचघरसह अतिदुर्गम भागाची जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी शुक्रवारी (ता. १९) पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील ग्रामस्थांकडून रस्ते, पाणी, शिक्षण व आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या. ग्रामस्थांनी आपल्याला भेडसावत असलेल्या समस्यांचा पाढाच जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडून भावना व्यक्त केल्या.

पाचघर या गावाजवळ गर्भवती महिलेला स्थानिक नागरिक परळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेताना चिखलात रुतलेल्या जीप गाडीला धक्के मारून मुख्य रस्त्यापर्यंत आणावी लागल्याचे वृत्त ''सकाळ''मध्ये प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा पाहणी दौरा करण्यात आला होता. पाचघर गावासह तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रस्ते, शिक्षण, पाणी व आरोग्यविषयक समस्यांची सोडवणूक प्राधान्य क्रमांकाने करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनंता वनगा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या घटनेची शासनस्तरावर गांभीर्यपूर्वक दखल घेतली असून तातडीने समस्यांचे निवारण केले जाईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले. या पाहणी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी भवानजी आगे पाटील, तहसीलदार उद्धव कदम, पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खताळ, बांधकाम विभागाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93726 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..