विवा महाविद्यालयाची मुले हुशार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवा महाविद्यालयाची मुले हुशार
विवा महाविद्यालयाची मुले हुशार

विवा महाविद्यालयाची मुले हुशार

sakal_logo
By

वसई, ता. २० (बातमीदार) : पालघर येथे मुंबई विद्यापीठ आयोजित ५५ व्या विभागीय युवा महोत्सवात विरारच्या वि. वा. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सर्वच ११ कला प्रकारांत मोठे यश संपादन करून ठसा उमटवला.
विवा महाविद्यालयात मुलांच्या कलागुणांना वाव दिला जातो, त्यामुळे अनेक कला व क्रीडा प्रकारांत होणाऱ्या स्पर्धेत हे विद्यार्थी सहभागी होत आपले नैपुण्य दाखवत असतात. नुकत्याच पार पडलेल्या युवा महोत्सवात एकांकिका, समूहगायन, मूकाभिनय, एकपात्री अभिनयासह पाश्चिमात्य कलाही सादर करत पारितोषिके मिळवली आहेत.
हिंदी एकांकिका, मिमिक्री, समूह गायन, कथाकथन, पाश्चिमात्य समूहगीत, वेस्टर्न सोलो, एकपात्री मराठी अभिनयात प्रथम क्रमांक; तर मूकाभिनय द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच एकपात्री हिंदी, लोकनृत्य, नाट्यसंगीत या प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला आहे. विवा महाविद्यालयाचे विश्वस्त, प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.