अंबरनाथच्या चिमुकल्‍यांचे दुबईत तबलावादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथच्या चिमुकल्‍यांचे दुबईत तबलावादन
अंबरनाथच्या चिमुकल्‍यांचे दुबईत तबलावादन

अंबरनाथच्या चिमुकल्‍यांचे दुबईत तबलावादन

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २० (बातमीदार) : अखिल भारतीय तबला वादन स्पर्धेमध्ये अंबरनाथसह बदलापूरच्या सात चिमुकल्‍यांनी दुबई येथे बहारदार तबला वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्याशिवाय चार सुवर्ण, दोन कांस्य आणि एक रौप्यपदक पटकावत भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव अनोख्या रीतीने साजरा केला.
दुबईला युनेस्को अंतर्गत नुकतीच आंतरराष्ट्रीय तबला ऑलिंपियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अंबरनाथच्या श्री गुरुकृपा संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. प्रशिक्षक सुनील शेलार यांच्याकडे तबला वादनाचे धडे घेतलेल्या अरुष आयरकर, श्रेयस भोईर, गौरव करवंदे, आळंदी आहीर या चौघांनी स्पर्धेत सुवर्ण पदक, तर सिद्धार्थ कांबळे याने सिल्व्हर आणि मेघा कामत, तनय गवई यांनी रौप्य पदकांची लयलूट केली.
शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते शनिवारी वाळेकर यांच्या हस्ते प्रशिक्षक सुनील शेलार आणि स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला. वयाच्या लहानपणीच मुलांमध्ये संगीताची आवड निर्माण केली याबद्दल शहरप्रमुख वाळेकर यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षक शेलार यांचे विशेष कौतुक केले. गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांना तबला वादनाचे प्रशिक्षण देण्यात येते. यावर्षी १५ ऑगस्टला दुबईत अखिल भारतीय तबला वादन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १३ ऑगस्टला दुबईला गेले होते. १५ ऑगस्टला स्पर्धकांनी दुबईत तबला वादन केले आणि नंतर भारतात परत आल्याचे प्रशिक्षक शेलार यांनी सांगितले.