बस आणि चारचाकीच्या धडकेत चालक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बस आणि चारचाकीच्या धडकेत चालक जखमी
बस आणि चारचाकीच्या धडकेत चालक जखमी

बस आणि चारचाकीच्या धडकेत चालक जखमी

sakal_logo
By

मनोर, ता. २० (बातमीदार) ः चारचाकीने एसटी बसला मागून धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना मनोर-पालघर रस्त्यावर नेटाळी गावच्या हद्दीत शनिवारी (ता. २०) सकाळी घडली. यात चारचाकीचे बरेच नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.

नेटाळी गावच्या हद्दीत अरिहंत कंपनीलगत हा अपघात घडला. पालघरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसने अचानक ब्रेक दाबल्याने तिच्या मागून चालणाऱ्या चारचाकीने बसला धडक दिली. एसटी बसच्या पुढे आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी बसचालकाने ब्रेक दाबल्याचे सांगण्यात येत आहे, पण चारचाकी धडकल्याने तिच्या समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच यात चालकही किरकोळ जखमी झाला.