संशयास्पद बोटप्रकरणी एटीएसकडून गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संशयास्पद बोटप्रकरणी
एटीएसकडून गुन्हा दाखल
संशयास्पद बोटप्रकरणी एटीएसकडून गुन्हा दाखल

संशयास्पद बोटप्रकरणी एटीएसकडून गुन्हा दाखल

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर किनाऱ्यावर आढळलेल्या संशयास्पद बोटप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या या बोटीत तीन एके-४७ आणि काही काडतुसे आढळली होती. एटीएसने या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर बोटीशी संबंधित माहिती मागवली आहे.
१८ ऑगस्टला रायगडच्या हरिहरेश्वर किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट येऊन धडकली होती. या बोटीत तीन एके-४७ आणि काही काडतुसे आढळली होती. दहशतवादी कारवाईच्या संशयाने पोलिसांनी तातडीने या घटनेची दखल घेत राज्यभर हाय अलर्ट जारी करण्यात आला. प्रमुख शहरांमध्ये नाकाबंदी करत पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात या प्रकरणाबाबत निवेदन करत सदर बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची असल्याचे स्पष्ट केले. तसेच बोटीचे इंजिन खराब झाल्याने कोरियन बोटीने त्यातील खलाशांना वाचवले आणि नंतर ही बोट भरकटत हरिहरेश्वर समुद्रकिनारी पोहोचली; मात्र सणासुदीचा काळ लक्षात घेऊन पोलिस आणि प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता राज्य एटीएसने याबाबत गुन्हा दाखल केला.