सिडको वसाहतींचा दोन दिवस पाणी पुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिडको वसाहतींचा दोन दिवस पाणी पुरवठा बंद
सिडको वसाहतींचा दोन दिवस पाणी पुरवठा बंद

सिडको वसाहतींचा दोन दिवस पाणी पुरवठा बंद

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २० ः महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे मुख्य फिडर जलवाहिनी बदलणे आणि मुख्य फिडर जलवाहिनीवरील दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ते २३ ऑगस्ट मध्यरात्री १२ वाजेपर्यंत तब्बल ४० तास पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. त्यामुळे नवीन पनवेल, काळुंद्रे, कळंबोली आणि करंजाडे नोडमधील वसाहतींना पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. यादरम्यान नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.