मुंबई विमानतळावरून पाच कोटींचे कोकेन जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koken
मुंबई विमानतळावरून पाच कोटींचे कोकेन जप्त

मुंबई विमानतळावरून पाच कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : इथिओपियाहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका महिला प्रवाशाकडून मुंबईतील सीमाशुल्क विभागाने ५०० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. शुक्रवारी कारवाई करण्यात आली. अमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात पाच कोटी रुपये आहे. या प्रकरणी सिएरा लिओनियन हिला अटक केली आहे.

ती इथियोपियातील अदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाइन्सच्या विमानाने मुंबईत आली होती. तिच्या पर्समध्ये अमली पदार्थ लपवून ठेवलेले कस्टम अधिकाऱ्यांना आढळले. तपासणीवेळी तिच्याकडे ५०० ग्रॅम कोकेन सापडले. या घटनेची माहिती तत्काळ इथियोपियाच्या दूतावासाला देण्यात आली आहे.

टॅग्स :crimeMumbaiMumbai Crime