वर्दळीच्या मार्गाची कायम दैनावस्‍था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्दळीच्या मार्गाची कायम दैनावस्‍था
वर्दळीच्या मार्गाची कायम दैनावस्‍था

वर्दळीच्या मार्गाची कायम दैनावस्‍था

sakal_logo
By

रोहा, ता. २२ (बातमीदार) ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या पांडापूर, आमटेम, नागोठणे ते कोलाड, तिसेदरम्यान ठिकठिकाणी पडलेल्‍या खड्ड्यांमुळे चालकांना वाहने चालवणे जिकिरीचे झाले आहे. कायम वर्दळीच्या मार्गाच्या दुर्दशेमुळे चालकांसह प्रवासीही हैराण झाले आहेत. गणेशोत्‍सवापूर्वी महामार्गावरील खड्डे युद्धपातळीवर काम करून बुजवण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.
महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अनेक वर्षे रखडले आहे. पावसामुळे त्याची पुरती दुरवस्‍था झाली आहे. पांडापूर-कोलाड ते तिसे हा रस्ता खूप खराब झाला आहे. कोकणात जाणा‌ऱ्या तसेच दैनंदिन प्रवास करणारे चालक, प्रवासी, विद्यार्थी अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. अनेकांच्या आरोग्‍याच्या व्याधी बळावल्‍या आहेत. ज्‍येष्‍ठ नागरिकांची महामार्गावरून प्रवास करताना पुरती दमछाक होते.
नागोठणे व कोलाड या ठिकाणाहून धाटाव व विळा एमआयडीसी क्षेत्र जवळ असल्याने मालवाहू कंटेनर व अवजड वाहनांची संख्या जास्‍त असते. एकंदरीत अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे पांडापूर ते कोलाड, तिसेदरम्यान महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

कोट :

या महामार्गावरून हजारो प्रवासी वाहनचालक दिवस-रात्र प्रवास करीत असतात, रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे त्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, रात्रीच्या वेळी खड्डे चुकविण्याच्या नादात दररोज येथे छोटे-मोठे अपघात होत आहेत. महामार्गावरील खड्डे गणपतीपूर्वी भरून एनएचएआयने सणासुदीला गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास काही प्रमाणात तरी सुखकर करावा.
- समीर शेडगे, शिवसेना रोहा तालुका प्रमुख.

फोटो केप्शन : मुंबई-गोवा महामार्गावरील पांडापूर ते कोलाडपर्यंत रस्त्याची झालेली दुर्दशा.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93811 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..