पडघा येथील कुंभेरेश्वर महादेव मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पडघा येथील कुंभेरेश्वर महादेव मंदिर
पडघा येथील कुंभेरेश्वर महादेव मंदिर

पडघा येथील कुंभेरेश्वर महादेव मंदिर

sakal_logo
By

भिवंडी तालुक्यातील पडघ्याजवळील कुंभेरी नदीकिनारी मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेले कुंभेरेश्वर महादेव मंदिर परिसरातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे भाविकांची या ठिकाणी पूजेसाठी नेहमी गर्दी असते.
खडवली फाट्याजवळील कुंभेरी नदीच्या खडकातून कोरून काढलेले शिवलिंग मंदिरात स्‍थापन करण्‍यात आले आहे. येथूनच जवळ असलेल्या आन्हे गावातील निस्सीम शिवभक्त असलेले कै. वाळकुबुवा लक्ष्मण भोईर यांनी १९८८ साली या शिवलिंगाची प्रतिष्ठापना मंदिरात केली असून पूर्वी या ठिकाणी एक छोटे कच्चे बांधकाम केलेले मंदिर होते; मात्र काही समाजकंटकांनी मंदिरातील शिवपार्वती मूर्तींची तोडफोड केल्यानंतर पडघा ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी एकत्र येत या मंदिरांचा जीर्णोद्धार केला.
हे शिवमंदिर पंचक्रोशीतील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असल्याने महंत शिवरुपानंद स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेचा मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होतो. महाशिवरात्री हा या मंदिरात साजरा होणारा मुख्य उत्सव आहे. या वेळी मंदिर परिसरात विविध प्रकारचे स्टॉल लावले जातात. येथे तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. या वेळी पंचक्रोशीतील लाखो शिवभक्त कुटुंबासह शिवलिंगाचे दर्शन घेतात. तसेच श्रावणात तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. दर सोमवारी या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. सायंकाळी होणाऱ्या महाआरतीलाही भक्तगण‍ आवर्जून हजेरी लावतात. मुंबई-नाशिक महामार्गालगत कुंभेरी नदीकिनारी निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या शिवमंदिरात २५ फूट असलेली साईबाबांची मूर्तीही सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93819 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..