सायन कोळीवाड्यात काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायन कोळीवाड्यात काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन
सायन कोळीवाड्यात काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन

सायन कोळीवाड्यात काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन

sakal_logo
By

वडाळा, ता. २१ (बातमीदार) ः दक्षिण-मध्य मुंबई वडाळा-सायन कोळीवाडा येथे कॉंग्रेसच्‍यावतीने हल्‍लाबोल आंदोलन करण्यात आले. कॉंग्रेस कमिटी प्रभाग क्रमांक १८१ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार केंद्र सरकारच्या राजकीय व आर्थिक धोरणांमुळे प्रचंड वाढलेली महागाई व बेरोजगारीच्या विरोधात ‘महंगाई पर हल्लाबोल’ अंतर्गत ‘महंगाई पर चर्चा’ हा आंदोलनात्मक कार्यक्रम पार पडला. शनिवारी (२० ऑगस्ट) सायंकाळी वडाळा पूर्व येथील आझाद मोहल्ला, शांतीनगर जनसंपर्क कार्यालयाजवळील बाजार येथे हे आंदोलन झाले. यावेळी काँग्रेस कमिटी महासचिव अमित शेट्टी, माजी नगरसेविका पुष्पा कोळी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93826 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..