मुरबाड शहरात खड्डे बुजवण्यासाठी मुहूर्त मिळेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरबाड शहरात खड्डे बुजवण्यासाठी मुहूर्त मिळेना
मुरबाड शहरात खड्डे बुजवण्यासाठी मुहूर्त मिळेना

मुरबाड शहरात खड्डे बुजवण्यासाठी मुहूर्त मिळेना

sakal_logo
By

मुरबाड, ता. २१ (बातमीदार) : गणेशोत्सव तोंडावर आला असूनही मुरबाड शहरातील हुतात्मा हिराजी पाटील प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावर पडलेले भलेमोठे खड्डे बुजवले जात नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. मुरबाड बाजार पेठ, ग्रामीण रुग्णालयाकडून म्हसा रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याची मागणी नागरिक करत असल्याने खड्डे बुजविण्यासाठी येथे पेव्हर ब्लॉक्स व रेती आणून ठेवली आहे; मात्र, हे खड्डे बुजवण्यासाठी मुहूर्त कधी मिळणार, याची नागरिक वाट बघत आहेत.
मुरबाड शहरातील मुख्य बाजारपेठ, शिवाजी चौकातून शहराबाहेर जाणारी दुचाकी-चार चाकी वाहने, मुरबाड पोलिस ठाण्याच्या जीप गाड्या, शासकीय धान्य गोदामातून धान्य वितरण करण्यासाठी ये-जा करणारी मोठी वाहने, तसेच मुरबाड ग्रामीण रुग्णालयातून सरळगाव, कल्याण, म्हसाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या रुग्णवाहिका याच रस्त्याने जातात. या मार्गावर हुतात्मा हिराजी पाटील कमानीजवळ डांबरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तेथून पादचारीसुद्धा व्यवस्थित चालू शकत नाहीत. याच रस्त्यावरून गणेशमूर्ती नेल्या जाणार असल्‍यामुळे हे खड्डे बुजविण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93829 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..