चारोटी उड्डाण पुलावरील पथदिवे बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चारोटी उड्डाण पुलावरील पथदिवे बंद
चारोटी उड्डाण पुलावरील पथदिवे बंद

चारोटी उड्डाण पुलावरील पथदिवे बंद

sakal_logo
By

कासा, ता. २१ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सध्या अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. याकडे महामार्ग प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यातच चारोटी आणि महालक्ष्मी मंदिराजवळील उड्डाण पुलावरील पथदिवे गेल्या पाच दिवसांपासून वीज बिल थकीत असल्याने बंद आहेत. त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे या दोन्ही उड्डाण पुलावरील पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. पण चारोटी आणि महालक्ष्मी मंदिराजवळ असलेल्या उड्डाण पुलावरील पथदिवे बंद असल्याने या परिसरात खूप अंधार असतो. त्यात महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे या दोन्ही उड्डाण पुलावरील पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी प्रवासी आणि ग्रामस्थ करीत आहेत. सध्या महामार्ग प्रशासनाचे टोल चालक व देखभाल ठेकेदार बदलले आहेत. चारोटी व महालक्ष्मी उड्डाण पुलावरील पथदिव्यांचे थकीत बिल न भरल्याने महावितरण अधिकाऱ्यांनी ठेकेदारांशी संपर्क साधला असता कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

कोट -
चारोटी उड्डाण पूल व महालक्ष्मी उड्डाण पुलावरील पथदिव्याचे थकीत बिल असून महामार्ग प्रशासनाकडे अनेक वेळा सूचना देऊनही हे बिल भरले नसल्याने शेवटी दोन्ही ठिकाणचा वीजपुरवठा पाच दिवसांपूर्वी बंद केला आहे. चारोटी उड्डाण पुलाचे एक लाख वीस हजार, तर महालक्ष्मी उड्डाण पुलावरील ८५ हजार इतके वीजबिल थकीत आहे.
- चंदन मोरे, शाखा अभियंता, महावितरण, चारोटी

याबाबतीत महामार्गाचे ठेकेदार राम राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. या दोन्ही उड्डाण पुलावरील पथदिवे बंद असल्याने खालील बाजूस जाणाऱ्या सेवा रस्त्यात खड्डे पडल्याने रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाण वाढले आहे, याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न वाहनचालक विचारीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93836 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..