पालघरमध्ये सद्‌भावना दौड उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमध्ये सद्‌भावना दौड उत्साहात
पालघरमध्ये सद्‌भावना दौड उत्साहात

पालघरमध्ये सद्‌भावना दौड उत्साहात

sakal_logo
By

पालघर, ता. २१ (बातमीदार) : केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा २० ऑगस्ट हा जयंती दिवस ‘सद्‌भावना दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त पालघर शहरात शनिवारी सद्‌भावना दौडचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या सूचनेनुसार जिल्हा क्रीडा अधिकारी व शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद आणि भारत स्काऊट्स गाईडस यांच्या वतीने सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी व शहरातील नागरिकांसाठी ही दौड आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, प्रकाश वाघ, सरिता वळवी, तेजश्री पाटील, स्काउट गाइडच्या विद्या भदाने, स. तु. कदम महाविद्यालयचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93837 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..