मढ समुद्र किनाऱ्याची स्‍वच्‍छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मढ समुद्र किनाऱ्याची स्‍वच्‍छता
मढ समुद्र किनाऱ्याची स्‍वच्‍छता

मढ समुद्र किनाऱ्याची स्‍वच्‍छता

sakal_logo
By

मालाड, ता. २१ (बातमीदार) ः मढ वटार गल्ली, मधला पाडा, भुतकर गल्ली, दरिया गल्ली, अंकुश गल्ली, वांद्रे गल्ली व पातवाडी या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर साचलेला कचरा माजी नगरसेविका संगीता संजय सुतार यांच्या प्रयत्नाने उचलला गेला आहे. मागील काही दिवसांपासून समुद्रातून वाहून आलेला कचरा येथे मोठ्या प्रमाणात साचला होता. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले होते. याबाबत संगीता संजय व इतरांनी पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने कचरा उचलण्याची व्यवस्था केली. त्यामुळे ग्रामस्थांना तसेच कोळी बांधवांना दिलासा मिळाला आहे. समाजसेवक संजय सुतार, ज्येष्ठ शिवसैनिक मोरेश्वर कोळी, सुनील सवले, दीपक वसावे, शाखाप्रमुख संदेश घरत यांनी यासाठी सहकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93846 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..