अर्धा तासात पैसे दुप्पट करतो सांगत फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धा तासात पैसे दुप्पट करतो सांगत फसवणूक
अर्धा तासात पैसे दुप्पट करतो सांगत फसवणूक

अर्धा तासात पैसे दुप्पट करतो सांगत फसवणूक

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २१ : तुमचे पैसे क्रिप्टोग्राफीमध्ये गुंतवून २० ते ३० मिनिटांत दुप्पट करून देतो, असे सांगत एका २६ वर्षीय युवतीची १ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. अश्लेषा तलाकोकक्कुल असे फसवणूक झालेल्या युवतीचे नाव आहे.

कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या अश्लेषा यांची इन्स्टाग्रामवर ट्रेडर शर्मा व रिचेस्ट शनाया या खातेधारकांशी मे महिन्यात ओळख झाली होती. या इन्स्टाग्राम धारकांनी तुमचे पैसे आम्ही क्रिप्टोग्राफीमध्ये गुंतवून २० ते ३० मिनिटांत दुप्पट करून देतो, असे सांगितले. त्यानंतर अश्लेषा यांच्या एचडीएफसी व साऊथ इंडियन बॅंकेच्या खात्यातून वेळोवेळी खोटे सांगून एक लाख ८१ हजारांची रक्कम ट्रान्सफर करून घेतली. ३० मे ते २ जून या कालावधीत ही फसवणूक झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अश्लेषा यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93851 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..