विरारमध्ये घुमला नाच ग घुमाचा आवाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरारमध्ये घुमला नाच ग घुमाचा आवाज
विरारमध्ये घुमला नाच ग घुमाचा आवाज

विरारमध्ये घुमला नाच ग घुमाचा आवाज

sakal_logo
By

विरार, ता. २१ (बातमीदार) : विरार येथील यंग स्टार ट्रस्टतर्फे महिलांसाठी आयोजित केलेल्या मंगळागौर स्पर्धेत आज घागर घुमू दे, नाच ग घुमा आणि इतर गाण्यांचा आवाज घुमला. या स्पर्धेला पेण, पनवेल, अलिबागसह पालघर जिल्ह्यातील महिला संघ सहभागी झाले होते.
आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या यंगस्टर ट्रस्टच्या वतीने दरवर्षी श्रावणात महिलांसाठी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कै. विद्या दयानंद पाटील यांच्या समरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. रविवारी पार पडलेल्या या स्पर्धेत पेण, पनवेल, अलिबाग, नवी मुंबईसह पालघर जिल्ह्यातील ३६ महिलांचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्‌घाटन माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील, माजी महिला आणि बाल कल्याण समिती सभापती माया चौधरी, माजी नगरसेवक हार्दिक राऊत, चिरायू चौधरी आणि स्नेहा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत महिला संघांनी आपल्या नृत्यामधून विविध सामाजिक संदेश दिले. स्पर्धेला परीक्षक म्हणून रश्मी खरे आणि स्नेहल आपटे यांनी काम पाहिले, तर सूत्रसंचालन मुग्धा लेले आणि मिलिंद पोंगशे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93863 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..