विकासकामांकडे कटाक्षाने लक्ष द्यावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासकामांकडे कटाक्षाने लक्ष द्यावे
विकासकामांकडे कटाक्षाने लक्ष द्यावे

विकासकामांकडे कटाक्षाने लक्ष द्यावे

sakal_logo
By

मुरबाड, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यातील प्रत्येक गावात सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमीसह विकासकामे करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेमार्फत निधी दिला जाईल. ही सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने व जबाबदारीने लक्ष द्यावे, अशा सूचना ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांनी नुकत्याच येथे दिल्या.

ठाणे जिल्हा परिषदेच्या कुडवली गटातील सरपंच, उपसरपंच, पंचायत समितीतील खातेप्रमुख, ग्रामसेवक आदींची विकासकामांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. त्यावेळी उपाध्यक्ष पवार बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या रेखा कंटे, गटविकास अधिकारी रमेश अवचार यांची उपस्थिती होती. कुडवली गटातील प्रत्येक गावातील समस्या व अडचणींचा आढावा घेण्यात आला. गावातील सरपंच व उपसरपंचांनी उपाध्यक्ष पवार यांच्याबरोबर संवाद साधला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलजीवन मिशन, शाळेच्या इमारतींची बांधकामे व दुरुस्ती, वीजपुरवठा, अंगणवाड्यांची दुरुस्ती आणि जनसुविधा आदी योजनांच्या माध्यमातून भविष्यात करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93864 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..