डहाणूत संसर्गजन्य आजार वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणूत संसर्गजन्य आजार वाढले
डहाणूत संसर्गजन्य आजार वाढले

डहाणूत संसर्गजन्य आजार वाढले

sakal_logo
By

डहाणू, ता. २१ (बातमीदार) : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला, तरी पावसाळ्याच्या दिवसात अन्य संसर्गजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यात ताप, सर्दी, खोकला याचे सर्वाधिक रुग्ण निरनिराळ्या खासगी तसेच सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यात हवामान बदल झाल्याने हिवताप, डेंगी, गॅस्ट्रो, कावीळ, स्वाईन फ्ल्यू इत्यादी संसर्गजन्य आजारात वाढ झाली आहे. तापाच्या आजाराने बंदरपट्टी भागातील वरोर, वाढवण, वासगाव, चिंचणी, धाकटी डहाणू, बाडापोखरण या परिसरात अनेक रुग्ण आढळले आहेत. एका महिन्याभरापूर्वी चिंचणी येथे डेंगीचा रुग्ण आढळून आला होता, असे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93865 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..