आशिष दामले यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आशिष दामले यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा
आशिष दामले यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा

आशिष दामले यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा

sakal_logo
By

बदलापूर (बातमीदार) : ठाणे जिल्हा अध्यक्षपदी सुरेश म्हात्रे यांची निवड होताच, बदलापूर शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा कॅप्टन आशीष दामले यांच्याकडे देण्यात आली आहे. यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते पत्र दामले यांना सुपूर्द करण्यात आले. घरात सामाजिक कार्याचा वारसा असल्याने, दामले हे नेहमीच समाजसेवक म्हणून कार्यरत आहेत. दामले यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली, तेव्हापासून त्यांनी विकासकामांचा शहरात सपाटा लावला. ताईज किचनच्या संकल्पनेपासून ते दादाज जिम, शारदा गिरणी, स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी स्वतंत्र अभ्यासिका, ग्रंथालय या व्यतिरिक्त कोरोना काळात केलेली कामे लक्षात घेऊन वरिष्ठांनी पुन्हा शहराध्यक्ष म्हणून कॅप्टन आशीष दामले यांच्या हाती शहराध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. पक्षश्रेष्ठींनी विचार करूनच मला पुन्हा ही जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता जबाबदारी दुपटीने वाढली आहे. मात्र आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यास शहरात राष्ट्रवादी काँग्रेस सदैव तत्पर असून, यापुढे आणखी चांगली कामे करून, शहरात पक्ष वाढीसाठीसुद्धा काम करणार असल्याचे कॅप्टन आशीष दामले यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93868 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..