आदिवासी पाड्यांचे पुनर्वसन संजय गांधी उद्यानात करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी पाड्यांचे पुनर्वसन संजय गांधी उद्यानात करा
आदिवासी पाड्यांचे पुनर्वसन संजय गांधी उद्यानात करा

आदिवासी पाड्यांचे पुनर्वसन संजय गांधी उद्यानात करा

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ ः संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांवरील नागरिकांना विस्थापित न करता उद्यानातच त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेने केली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे वनक्षेत्र असल्यामुळे तेथे अतिक्रमण केलेल्या झोपडीवासीयांचे तसेच आदिवासी पाड्यातील नागरिकांचेही अन्यत्र पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव पूर्वीपासून सरकारसमोर आहे. मात्र उद्यानातील आदिवासी नागरिक हे अनेक शतके तेथे राहत असल्यामुळे त्यांना उद्यानातून विस्थापित करू नये, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र ठाकूर यांनी केली आहे.

या आहेत प्रमुख मागण्या
उद्यानातील तेरा आदिवासी पाड्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी मिळून किमान दोन हजार घरे आहेत. त्यांना पुनर्वसनात देण्यात येणारे घर आणि सभोवतालचा परिसर कुटुंबप्रमुखाच्या मालकी हक्काने असावा. आदिवासींना सर्व मूलभूत सोयी-सुविधा द्याव्यात. त्यांना जंगलातील भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू आणण्यास कोणते निर्बंध घालू नयेत. पात्र आदिवासींना वनविभागातच नोकरी देण्यात यावी.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93871 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..