दहीहंडी उत्सवात पोलिसांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहीहंडी उत्सवात पोलिसांचा सत्कार
दहीहंडी उत्सवात पोलिसांचा सत्कार

दहीहंडी उत्सवात पोलिसांचा सत्कार

sakal_logo
By

भाईंदर (बातमीदार) : दहीहंडी उत्सव व मुख्यमंत्र्यांचा मिरा-भाईंदर दौरा अशी बंदोबस्ताची दुहेरी जबाबदारी चोखपणे पार पाडल्याबद्दल भाईंदर पश्चिम शिवसेना व जय श्री कृष्ण एकता मित्र मंडळाच्या वतीने पोलिसांचा सत्कार करण्यात आला. या वर्षी दहीहंडी उत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणावर होता. शहरात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे उत्सव निर्विघ्न पार पाडण्यापासून ते वाहतूक सुरळित ठेवण्यापर्यंत पोलिसांवर मोठी जबाबदारी होती. त्यातच उत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांचा मिरा-भाईंदर शहरातील दौरा घोषित झाल्यामुळे पोलिसांची जबाबदारी आणखी वाढली होती; मात्र पोलिसांनी चोख कामगिरी बजावल्यामुळे उत्सव कोणताही अनुचित प्रकार न घडता निर्विघ्नपणे पार पडला. यासाठी त्यांचा साठ फुटी येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात सत्कार करण्यात आला, अशी माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख जितेंद्र पाठक यांनी दिली. या वेळी तरुण जैन, वीरेंद्र म्हात्रे, तेजस्विनी पाटील, मिथुन लोढा, नितीन जाधव, उमेश आंबेरकर, बबलू बेरा आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93872 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..