जुईनगरमध्ये मद्यपींची उच्छाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुईनगरमध्ये मद्यपींची उच्छाद
जुईनगरमध्ये मद्यपींची उच्छाद

जुईनगरमध्ये मद्यपींची उच्छाद

sakal_logo
By

जुईनगर, ता. २३ (बातमीदार) : जुईनगरमधील मैदानांमध्ये मद्यपी आणि गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरातील महिला आणि लहान मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.
जुईनगरमधील महालक्ष्मी मंदिर, सेक्टर २५ मधील गणेश मैदान, सेक्टर २ येथील शिरवणे विद्यालय मैदानावर मद्यपी व गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. तसेच कॉलेजमध्ये जाणारी तरुण मुले रात्रीच्या अंधारात मैदानांमध्ये विविध प्रकारचे व्यसन करत आहेत. त्यामुळे मैदानात येणाऱ्या महिला आणि लहान मुलांना असुरक्षित वाटत आहे. संध्याकाळी या मैदानांमध्ये मद्यपींची मैफल बसत असल्याने परिसरातील नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवून हे प्रकार थांबवण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल ससाणे यांनी केली आहे.
----
संध्याकाळी मुले मैदानात खेळायला येतात. तिथे मद्यमान, व्यसन करणारी मुले पाहून त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे मैदानात येण्याची भीती वाटते.
- नंदा गाडगे, स्थानिक रहिवासी
---
जुईनगर सेक्टर २३, २४, २५, २ मध्ये गर्दुल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. सेक्टर २४ मधून जाताना या मुलांचे विचित्र प्रकार पाहून खाली मान घालून निघून जावे लागते. त्यामुळे हे प्रकार थांबणे गरजेचे आहे.
- पूजा आवारी, स्थानिक रहिवासी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93880 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..