बारवी प्रकल्पग्रस्तांना मिरा-भाईंदर महापालिकेत नोकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारवी प्रकल्पग्रस्तांना मिरा-भाईंदर महापालिकेत नोकरी
बारवी प्रकल्पग्रस्तांना मिरा-भाईंदर महापालिकेत नोकरी

बारवी प्रकल्पग्रस्तांना मिरा-भाईंदर महापालिकेत नोकरी

sakal_logo
By

भाईंदर, ता. २१ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाची उंची वाढवल्यामुळे विस्थापित झालेल्यांपैकी सुमारे दोनशे जणांना मिरा-भाईंदर महापालिकेत नोकरी मिळणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात शंभर जणांना सामावून घेण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिका व नगर परिषदांना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र जिल्ह्याला पाणी कमी पडू लागल्यामुळे बारवी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय झाला होता. या वाढीव उंचीमुळे आसपासच्या गावात राहणारे अनेक जण विस्थापित झाले होते. या सर्वांना सरकारी नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्यानुसार बारवी धरणाच्या पाण्याचा लाभ होणाऱ्या महापालिका व नगर परिषदांना त्यांच्या पाण्याच्या प्रमाणात या विस्थापितांना सेवेत समावून घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. दोन वर्षांपूर्वी मिरा-भाईंदर महापालिकेने या प्रस्तावाला संमती देणारा ठराव संमत करून तो राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावर बैठक होऊन महापालिका व नगर परिषदांच्या कोट्यानुसार सेवेत सामावून घ्यायच्या प्रकल्पग्रस्तांची यादी निश्चित करून ती राज्य सरकारकडे पाठवण्यात आली होती.
.....
अशी आहे प्रक्रिया
मिरा-भाईंदर महापालिकेला सुमारे दोनशे प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घ्यायचे आहे. पहिल्या टप्प्यात शंभर प्रकल्पग्रस्तांना सेवेत घेतले जाणार आहे. या सर्वांना महापालिकेने लेखी कळवून कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. यापैकी ९५ प्रकल्पग्रस्तांनी महापालिकेकडे कागदपत्रांसह अर्ज दाखल केला आहे. या सर्वांच्या कागदपत्रांची सध्या छाननी करण्याचे काम सुरू आहे.
महापालिकेच्या मंजूर असलेल्या पदांपैकी पाच टक्के जागा प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव आहेत. त्यानुसार ही भरती केली जाणार आहे. या सर्व प्रकल्पग्रस्तांना वर्ग तीन व वर्ग चारच्या सेवेत सामावून घेतले जाणार आहे. याव्यतिरिक्त एखाद्या प्रकल्पग्रस्ताकडे विशेष शैक्षणिक पात्रता असेल आणि महापालिकेत ती जागा रिक्त असेल तर त्याला त्या पदावरही समाविष्ट करून घेतले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93882 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..