शिवसेना भाजपमध्‍ये बॅनर वॉर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना भाजपमध्‍ये बॅनर वॉर
शिवसेना भाजपमध्‍ये बॅनर वॉर

शिवसेना भाजपमध्‍ये बॅनर वॉर

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २१ (बातमीदार) ः गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेतील ५० आमदारांनी शिंदे गटात सामील होत भाजपसोबत राज्यात नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर भाजपने मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापित करण्यासाठी आपली पुढची राजकीय पावले उचलायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विक्रोळीत आज शिवसेना भाजपमध्‍ये बॅनर वॉर पाहायला मिळाले.
भाजपने आज रविवारी सेनेचा बालेकिल्ला असलेल्या विक्रोळीत कन्नमवार नगर येथील विकास हायस्कूल शाळेत निर्धार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याचे भाजपकडून विभागात बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर कन्नमवार नगरचा विकास हाच आमचा ध्यास असे लिहून भाजपने पालिकेचे रणशिंग फुंकले आहे; तर दुसरीकडे त्या बॅनरसमोरच शिवसेना आमदार सुनील राऊत यांचे बॅनर लावण्यात आले आहेत.
नुकतेच दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर भाजपने मुंबईत ३७० ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा केला आणि या उत्सवात महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात हंडी फोडत शिवसेनेला डिवचले. आमदार आशीष शेलार यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर शेलार यांनी प्रत्येक विभागात कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित केला आहे.

काय आहे सेनेचे बॅनर?
सेनेच्या बॅनरवर र्इडीद्वारे लोकप्रतिनिधींना येणारी नोटीस, चौकशी, कारवाई, भाजपमध्ये पक्षप्रवेश न केल्यास अटक आणि पक्षप्रवेश झाल्यास लोकप्रतिनिधीला सरळ क्लीन चिट व पदांची मेजवानी लिहीत पुढे ‘कशी लोकशाहीची थट्टा मांडली रे’ असे बॅनर विक्रोळीत लावण्यात आले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93889 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..