‘बॉर्डरचा राजा’ आज मुंबईतून रवाना होणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बॉर्डरचा राजा’ आज मुंबईतून रवाना होणार!
‘बॉर्डरचा राजा’ आज मुंबईतून रवाना होणार!

‘बॉर्डरचा राजा’ आज मुंबईतून रवाना होणार!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : ‘किंग ऑफ एलओसी’ म्हणून ओळखला जाणारा जम्मू-काश्मीरमधील पूँछ येथील गणपती बाप्पा सोमवारी (ता. २२) सकाळी वांद्रे टर्मिनस येथून ‘स्वराज्य एक्स्प्रेस’ने जम्मूसाठी रवाना होणार आहे. पूँछमध्ये विराजमान होणारी ही गणेशमूर्ती कुर्ला येथील मूर्तिकार विक्रात पांढरे यांच्या सिद्धिविनायक गणेश चित्र शाळेत घडवली आहे.
भारत-पाक सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी मानवाधिकार कार्यकर्त्या किरण बाला सोमराज इशर (ईशरदीदी) आणि शिवनेर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक छत्रपती आवटे यांच्या वतीने पूँछ गावात गेली सलग १२ वर्षे भारत-पाक ‘बॉर्डरचा राजा’ची प्रतिष्ठापना केली जाते. गेली दोन वर्षे कोरोनाचे सावट असतानाही सीमेवर गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. यंदा कोरोनाचे विघ्न दूर झाले आहे. त्यामुळे साडेपाच फुटांच्या बाप्पाची मूर्ती यंदा पूँछमध्ये रवाना करण्यात येणार आहे.
पुलस्त ऋषींच्या नावाने प्रसिद्ध पुलस्त नदीच्या तटावर वसलेल्या पूँछ गावात गणेशोत्सव साजरा करण्याचे हे आमचे अखंडित १३ वे वर्ष आहे. याही वर्षी गनर रेजिमेंटच्या जवानांसोबत गणेशोत्सव उत्साहात साजरा करणार असल्याची माहिती ईशरदीदी यांनी दिली. पूँछमध्ये गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर भारतीय सैनिक उत्सवात सहभागी होतात. याठिकाणी पहिल्या रविवारी महायज्ञ, महाभंडाऱ्याचे आयोजन केले जाते, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93898 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..