मोनाटोना कंपनी चार वर्षांपासून बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोनाटोना कंपनी चार वर्षांपासून बंद
मोनाटोना कंपनी चार वर्षांपासून बंद

मोनाटोना कंपनी चार वर्षांपासून बंद

sakal_logo
By

वाडा, ता. २१ (बातमीदार) ः तालुक्यातील डाकिवली व घोणसई या ग्रामपंचायत हद्दीतील मोनाटोना टायर कंपनी गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे. बेरोजगारीमुळे हे कामगार त्रस्त झाले असून लवकरात लवकर कंपनी सुरू करावी, अशी मागणी करत आहेत.

डाकिवली व घोणसई या ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोनाटोना ही दुचाकी व चारचाकी टायरचे उत्पादन करणारी कंपनी होती. या कंपनीत सुमारे ८०० ते ९०० च्या आसपास स्थानिक कामगार काम करत होते. विशेषतः कंपनीच्या आजुबाजूच्या गावातील कामगार येथे काम करीत होते. मात्र कंपनी प्रशासनाने कुठलेही ठोस कारण न देता कंपनी गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी बंद केली. वाड्यासारखा अतिमागास भागाचा विकास करणे व येथील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, या हेतूने १९९२ मध्ये तत्कालीन सरकारने या भागात डी प्लस झोन ही योजना जारी केली. या योजनेत सरकारने कारखानदारांना सवलती दिल्या. या सवलतीचा फायदा घेत अनेक कारखाने येथे आले. मात्र, काही कारखान्यांनी फक्त सवलतीचा लाभ घेऊन आपला गाशा गुंडाळल्या सांगितले जाते.
या भागात जवळपास ३५ ते ४० टक्के लोखंड बनविणारे कारखाने आले होते. मात्र, यातील बरेचसे कारखाने बंद झाले आहेत. विजेचे दर वाढले असल्याने उत्पादन करणे परवडत नसल्याने त्यांनी कारखाने बंद केल्याचे कारण कारखानदार देतात.
----------
हिशेबही दिला नाही
कंपनी बंद झाल्याने शेकडो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कंपनी प्रशासनाने कंपनी बंद केली असली तरी कामगारांचा हिशोबही दिलेला नाही. कंपनीने कामगारांचा हिशेब तरी आता द्यावा, अशी मागणी कामगार करू लागले आहेत.
----------
कंपनी प्रशासनाने कोणतेही कारण न देता कंपनी बंद केली आहे. आता एवढा कालावधी उलटला, तरी कंपनी सुरू व्हायची काही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आम्हा कामगारांना वणवण फिरण्याची वेळ आली आहे.
- नितीन चौधरी, कामगार

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93902 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..