क्रशर मशिनच्या साहित्याची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रशर मशिनच्या साहित्याची चोरी
क्रशर मशिनच्या साहित्याची चोरी

क्रशर मशिनच्या साहित्याची चोरी

sakal_logo
By

मनोर, ता. २१ ः क्रशर मशीनवरील लोखंडी इलेक्ट्रिक पॅनल आणि पाण्याच्या टाकीच्या चोरीप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (ता. २०) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास किराट गावच्या जाधव पाड्यात भंगारवाल्याच्या वाहनात लोखंडी पॅनल आढळून आले होते. ग्रामस्थांनी भंगार खरेदी करणाऱ्या व्यक्तीला पकडून वाहनासह मनोर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

किराट गावातील ताकेश्वर स्टोन क्रेशर मशीन एप्रिल २०२२ पासून बंद आहे. क्रशर मशीनलगत भाड्याने घेतलेल्या कार्यालयाच्या आजुबाजूला क्रशर मशीनचे लहान मोठे साहित्य ठेवण्यात आले होते. रात्रीच्या वेळी कोणीही नसल्याचा फायदा घेत गुरुवारी (ता. १८) रात्री चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने कार्यालयातील सामान अस्ताव्यस्त करून टाकले होते. कार्यालयाबाहेर ठेवलेली पाण्याची टाकी चोरून नेली. शुक्रवारी सकाळी पहारेकरी क्रशर मशीनवर गेला असता त्याला कार्यालयाचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. तसेच, कार्यालयाबाहेरील पाण्याची टाकी गायब झालेली दिसली. शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास किराट गावच्या जाधव पाड्यात भंगार खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या वाहनात लोखंडी पॅनल आढळून आला होता. पॅनल चोरीचा माल असल्याचा संशय आल्याने अरुण पावडे आणि ग्रामस्थांनी भंगार खरेदी करणाऱ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93903 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..