खडवली प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खडवली प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था
खडवली प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था

खडवली प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था

sakal_logo
By

खडवली, ता. २१ (बातमीदार) : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या खडवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आहे; पण ठाणे जिल्हा परिषद, आरोग्य यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे, असा आरोप येथील नागरिक करत आहेत.

कल्याण -भिवंडी तालुक्यातील वळकास, बेहरे, कळंबोली, सोर, आन्हे, नडगाव, कुंभारपाडा, चिंचवली, फळेगाव, वावेघर, राया, ओझर्ली, गुरवली, निंबवली तसेच इतर आदिवासी पाड्यातील नागरिकांना आरोग्य सुविधेसाठी याच प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे लागते. परिसरातील बहुतांश नागरिक उपजीविकेसाठी शेतीवर अलंबून आहेत. त्यामुळे रात्री अपरात्री सर्पदंश, विंचूदंश झाल्यास तसेच एखादा अपघात किंवा गरोदर मातांना अत्यावश्यक सेवेसाठी येथे आणल्यास वेळेवर उपचार न मिळाल्याच्या घटना अनेकदा घडत असतात. खडवली येथे नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93907 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..